नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव , मी भक्त तू देव ऐसे करी ॥१॥
दावी रूप मज गोपिका रमणा, ठेवू दे चरणावरी माथा ॥२॥
पाहिन श्रीमुख देईन आलींगन , जिवे लिंबलोण करी ॥३॥
तुका म्हणे यासी न लावी उशीर माझे अभ्यंकर जाणोनीया ॥४॥