व्यर्थ व्यर्थ गेला जन्म , काय केले बा साधन ॥धृ॥
इंद्रियाचे पुरविले लाड, नाही संतसंगाची जोडी सुचिता शुद्धता, दुर सारीले अनंता ॥१॥
आता तरी जागा होई, शरण विठ्ठलासी जाई ॥२॥
महापापी उद्धरीले, नाही कोण उपेक्षीले तोची तारील तुजला, मार्ग भक्तीचा चांगला ॥४॥