आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव । देवताचे नाव सिद्धेश्वर ॥१॥
चौर्यांसी सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा । तो सुख सोहळा काय बानू ॥२॥
विमानांची दाटी पुण्यांचा वर्षाव स्वर्गीहूनी देव करीताती ॥३॥
नामा म्हणे देवा चला तया ठाया विश्रांती घ्यावया कल्पवरी ॥४॥