धरील्या देहाचे सार्थक करीन आनंदे भरीन तिन्ही लोक ॥धृ॥
नामची नौका धरील्या सहस्त्रभरी नावाडी श्रीहरी पांडुरंग ॥१॥
लाविन निशाण जावया वैकुंठा । गाजविन पेण भक्तीची या ॥२॥
भाविक हो येथे धरावा आवंका । दास विनवी तुका भाविकासी ॥३॥