रंग मांडीला रिंगणी, उभा ठाकला किर्तनी ॥१॥
हाती घेऊनीया वीणा कंठी राहे नारायणा ॥२॥
सावळी देखिली मुर्ती । माझ्या जिवाची विश्रांती ॥३॥
तुका म्हणे देगा देवा, माझ्या भजनाचा ठेवा ॥४॥