कोठे गुंतलासी योगीयांचे ध्यानी । आनंद किर्तनी पंढरीच्या ॥१॥
काय काज कोठे पडलीसे गुंती । कानी न पडती शब्द माझे ॥२॥
काय शेषशयनी सुखे निद्रा आली । सोय का सांडीला माझी देवा ॥३॥
तुका म्हणे कोठे गुंतलासी सांगा । किती पांडुरंगा वाट पाहू ॥४॥