पाहु द्या रे मज विठोबाचे रूप । लागलीसे भूक डोळा माझ्या ॥धृ॥
जाई जुई, पुष्पे गुंफनीया माळा । घालू घननीळा आवडीने ॥१॥
कस्तुरी कुंकुम भरूनिया ताटी । अंगी लावू उटी गोपाळाच्या ॥२॥
नामा म्हणे विठू पंढरीचा राजा । डोळिया पारणा होत असे ॥३॥