पावले संकटी गजानन पावले संकटी ॥धृ॥
पावलासी धावलासी व्यापक सर्वाघरी ॥१॥
कार्यारंभी नमितो तुजला । भबार्णवाच्या तटी ॥२॥
शेंदुर दुर्वा प्रियदल तुजला । मोदक वाढीन ताटी ॥३॥
तुका म्हणे पायांपाशी । धाऊन घालीन मिठी ॥४॥