भक्तीऋण घेतले माझे । चरण गहाण आहेत तुझे ॥धृ॥
प्रेम व्याज देई हरी । माझा हिशोब लवकर करी ।
तुझे नामे माझे खत । सुखे करी पंचायत ॥३॥
माझे मी न सोडी धन । नित्य करीन हरी कीर्तन ॥४॥
तुका म्हणे गरुडध्वजा । यासी साक्ष सदगुरु राजा ॥५॥