मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा पुनरपी संसारा येणे नाही । चित्त हे शेवन्ती अर्पुनी भगवती पुनरपी संस्कृति येणे नाही । मन हे तुळसी अर्पुनी ऋषीकेशी पुनरपी जन्मासी येणे नाही । तुका म्हणे ऐसा जन्म दिला देवा । तया वास केला वैकुण्ठाचा ।