HOME|mr|sahitya|bhajan|4|
भजन  आनंद सुदिन आजी आला सदनाला भजन  आज गुरु पौर्णिमा  आम्हा
भजन - प्रथम आरंभू ग देवा गणपति ...


भजन - A bhajan or kirtan is a Hindu devotional song, often of ancient origin. Great importance is attributed to the singing of bhajans with Bhakti, i.e. loving devotion. "Rasanam Lakshanam Bhajanam" means the act by which we feel more closer to our inner self or God, is a bhajan. Acts which are done for the God is called bhajan.

4GOOG
भजन

प्रथम आरंभू ग देवा गणपति । साह्य होईल ग माता सरस्वती । एकादशी वर्णावया द्यावी मज मति । पुण्य पावन म्हणती एकादशी । ते व्रत विष्णू सांगती इंद्रासी । षोड्‍पोचार इंद्र पूजा करी । नाना वाद्ये वर वाजंत्री वाजती । ऋषी म्हणती पुढे आहे मोठी किर्ती । सकली देवांगण मिळूनी गाणे गायी । नगर नारीची ती पुष्पे ती सरली श्रृंगार वाड्याची ती फुले पुष्पे चांगली । रुख्मांगद राजा हा सकाळी उठला । चरण चाळीत मळ्याशी गेला । हांका मारितो समस्त माळीला फुले कोमल आणा उपवर भोगायाला । फुले आणाया गेले अवघे माळीजन, फुले फुलभार चोरी नेलासा उतरून । एकून एक फुले नेलेस वेचून, फुले चोरटे हे आले असेल कोण । लटके सांगता हो मजपाशी येऊनी । दोन प्रहर रात्र ही लोटली । थोर धाक अंगी हुडहुडी भरली । ग्रंथीक झाडीची त्यांनी आघाडी हो केली । ग्रंथीक घुमान हो लागली विमानी । एवढे दोषी विमान बसले भूमीशी । थोर माळी मनी आनंदला । तो हरक आनंद रायासी सांगू गेला राव आम्ही चोर धरियेला । मुखपाल ते घालूनी निजविला राव म्हणती नाही काही । आणखी येऊनी तुम्हासी सांगती । काय आहे हो त्याची दिव्यकांती । रुख्मांगद राजा हा सकाळी उठला चरण चालत माळीयाशी गेला कारण वचन रुख्मांगदाने केले ते म्हणती काय असे तुझ्या चित्ती । तुमचा ठाव ठिकाण आम्ही स्वर्गीचे गंधर्व, फुले आणावया धाडीले इंद्रराव । तोही नेमाने पूजितो विष्णुदेव, त्याचे नाव प्रत्यक्ष केशवराजा म्हणतो भले पवित्र दिसता चोरी करिता काय आधारिता एकाच नेऊनी हो एकाला वाहता, काय हो होईल तुम्हाला सारिथ्य । पाप पुण्य आम्हा काही ना लागत । पाप पुण्याची त्वा केली असे हानि स्वर्गींचे विमान बसले धरणी । पाप पुण्य आम्हा काही ना लागत, गंधर्व म्हणती काय करशी दानधर्म, नाही केले एक एकादशी पूर्ण, काय आज्ञा द्यावी मज सेवकासी । सहस्त्र गायी देती ब्राह्मणासी, वाट होऊ द्या हो तुमच्या विमानाशी । सोनदान देतो ब्राह्मणाला, वाट होऊ द्या हो तुमच्या विमानाला । गांव मोकाशी देती ब्राह्मणाला, वाट होऊ द्या हो तुमच्या विमानाला । गुणमति जातो वैराग्य घेऊन । गंधर्व म्हणे काय करशी दानधर्म, नाही केले एक एकादशी पुण्य नाही देखीली स्वप्नी एक एकादशी । शास्त्र काढुनी नीट सांगावे आम्हाशी । गंधर्व म्हणती हेची यथार्थ साहित्य । दशमीच्या दिवशी अळणी दहीभात । पंगतीशी घ्यावा एक आतिथ्य । दांत कोरूनी तुळस घालावी मुखांत, दुसरे दिवशी करावे गंगास्नान । मग करावे देवदेवार्जन । मग करावे श्रीहरीचे पूजन । बारा ब्राम्हण घालावे बारशीशी, बारा न घडे घालावे पांचाशी । पांच न घडावे घालावे तिघाशी । तिघ्याशी न घडे घालावे एकाशी । एकाशी न घडे घास घालावे गाईशी, गोग्रास न घडे फुले वाहावी देवाशी । फुलपुष्प हे भगवंत पूजन ते केले अंबऋषीने, साधन त्या घरी जन्म घेती हो भगवान, ज्याचा भाव आहे देवापाशी, त्याचा चर्तुभुज आहे कृष्णाजी पाठीशी । पिताबंरची सांवली करा त्यासी त्वरा करा, । नगरामध्ये डांगोरी पिटती । जन लोक हे जेवले म्हणती सासु सुना त्या ग दोन्ही परटीनी तिचे नाव आहे आबाई । त्याही दोघीचे झाले भांडण । भांडता भांडता नाही भक्षिले अन्न । आण म्हणती चौकशीने परटीण । तिचे नांव आहे आबई म्हणून तिची । होती धारावतीसून तिच्याकडूनी गंगास्नान । तिच्या पुण्याने वरती चढले विमान । ते व्रत राजाने धरिले चित्ताशी । हत्ती घोड्याच्या पागा ठेविल्या उपाशी । गाई म्हशीचे कळप ठेविले उपाशी । शेळ्या मेंढ्याचे खिल्लार ठेविले उपाशी नगरासहीत राजा एकादशी करी । जे मरे ते जात वैकुंठाशी । थोर राग आला या यमदूताशी मग दूत पाचारी चिठ्ठ्या टाकी ब्रम्हदेवाशी । ब्रह्मदेव पाचारी म्हणतो मोहिनीशी । मोहीनी जाई ग मृत्यूया लोकाशी । मोहीनी घेतली मोहीनीची माळ । मोहीनी बसली ग वृंदावनी अनुष्ठान, ती देखिली राजानी नरानी, राजा म्हणतो तू कोणयाचो कोण? मोहिनी म्हणती मी आहे देवांगना । ऐसा योग्यवर पाहिजे हो मज जे माझे वचन ऐकील, जे मी सांगेल तेची ऐकेल माळ घाल भ्रर्तार लागून, राजा म्हणतो तुझे वचन पाळील । मोहिनीनी माळ घातली राजकाला, मोहिनीनी माळ घालूनी राजा भूलवूनी टाकिला, राजा उन्नात मदमस्त झाला । कुणी एके दिवशी डांगोरा शब्द ऐकिला शास्त्र काढून नीट सांगत होतो जनाला । कसे उरफाटे झाले असेल मजला । मोहिनी जवळ पदर धरीला । कुठे जातो सांगरे श्रीहरी, मी जातो ग आपल्या गृहासी । उद्या आहे ग व्रत एकादशी, मग सोडीन साधन द्वादशी । मग येईन तुझीया मंदिराशी, तुझ्या पुत्राचे शीर देई माझ्या हाती । मग कर तू व्रत एकादशी, राजा पाचारी रुख्मगंदाशी स्त्रियेशी । कसे येते ग तुझ्या विचाराशी । तुझ्या पुत्राचे शीर मोहिनी मागते आम्हाशी नाहीतर मोडा एकादशी । हरीचंद्रराजा स्वप्नी देखिला । डोंबाघरी वाहतसे पाणी । त्यांनी आपले सत्व जाऊ दिले नाही । माझ्या पुत्राचे शीर तुम्ही सुखे द्यावे । व्रत एकादशी नाहीच मोडावी । राजा पाचारी तो रुक्मागंदाया सुनासी । कसं येत ग तुझ्या विचाराशी । तुझ्या कांताचे शीर मोहिनी मागते आम्हासी । नाहीतर मोडा व्रत एकादशी । माझ्या क्रांताचे शीर सुखे तुम्ही द्यावा । व्रत एकादशीचे नाहीच मोडावे । राजा पाचारी धर्मगंद या पुत्रासी । कसं येत रे तुझ्या विचारासी तुझं शीर मोहिनी मागे आम्हासी । नाहीतर मोडा म्हणे व्रत एकादशी शीर सुखे तुम्ही द्यावे व्रत एकादशी नाही मोडावे । त्याही चौघांचे झाले एकमत । मोहीनी बोलली उगाच हेडसावून । डावे हाती काय करशील दानधर्म । राजाने खड्ग धरिले उजवे करी । शंख चक्र पिंताबर धारी, देवाने झेलीले असे वरचे वरी । त्याही चौघांना आले असे हो विमान । विमांनी बसले ते चौघे जण । आम्हाकडून करविली एकादशी तू तर विमानी एकला कसा जाशी । हत्ती घोड्याच्या पागा ठेविल्या विमानी शेळ्या मेढ्यांचे कळप घेतिले विमानी । वनीचे वन पाखरू राजाने विमानी घेतले नगरा सहित राजा विमानी बैसला । ध्वजा लावूनी राजा वैकुंठासी गेला । एवढा प्रताप हो एकादशी बाईने केला । जे गाती जे ऐकती त्याशी श्रीराम भेट देतीं । अंती होईल ग मोक्षाची प्राप्ती ।

Translation - भाषांतर

N/A
4GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-06-10T01:26:39.0000000Z

Comments | अभिप्राय