HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|भाग ३|
भजन वृंदावनी वेणू कवणाचा माये भजन झाले मी बावरी आवरी बांसरी
भजन - यमुनेच्या तीरी काल पाहिला...


भजन - A bhajan or kirtan is a Hindu devotional song, often of ancient origin. Great importance is attributed to the singing of bhajans with Bhakti, i.e. loving devotion. "Rasanam Lakshanam Bhajanam" means the act by which we feel more closer to our inner self or God, is a bhajan. Acts which are done for the God is called bhajan.

3GOOG
भजन

यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी । कान्हा वाजवितो बासरी ॥धृ॥

घागर घेऊनी पाणियासी जाता । येतां जाता आम्हा अडविता ।

आमच्या शीरी घडा याने मारिला खडा । याने केली आमची मस्करी ॥१॥

दही दुध घेऊनी गवळ्याच्या नारी । जात होत्या मथुरे बाजारी ।

त्यांचा भरला घडा याने मारीला खडा याने केली आमची मस्करी ॥२॥

यशोदा धुंडले गोकुळ नगरी । अवचित पाहिला राधिकेच्या घरी ।

राधिकेच्या घरी हरी पलंगावरी । पाहून राधा झाली घाबरी ॥३॥

जनी म्हणे बा श्रीहरी । भोग भोगिले बाळ ब्रह्मचारी ।

जनी म्हणे देवा खुप केला तुम्ही असुन ब्रह्माचारी ॥४॥

Translation - भाषांतर

N/A
3GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-06-10T01:38:11.0000000Z

Comments | अभिप्राय