झणी दर्शन दे मज दत्ता रे झणी दर्शन दे मज ॥धृ॥
अपराधी मी जन्मीचा परी तुजवीण कोणी न त्राता रे ॥१॥
ध्यान धारणी चित्त न लागे तळमळ निशीदिनी चिंता रे ॥२॥
श्री गुरुनाथा सद्गुरु नाथा ठेविन तव पदी माथा रे ॥३॥