हा दत्तराज माझा योगी पहिला ॥धृ॥
औदुंबर तरु छायेखाली ध्यानासी बसला ॥१॥
भगवी कौपीन दंड कमंडलू छाटी पांघरला ॥२॥
जानकी इच्छीत नित्य मानसी गुरुचे पदकमला ॥३॥