कृष्णा आता नको जाऊं बाहेरीरे कान्हा । आता गौळणी तुज धरु टपल्यारे ॥धृ॥
गोळणी येती गार्हाणी सांगती अशा खोड्या तू कोठे शिकलारे ॥१॥
गवळ्या घरी जासी दहीं दूध खाशी काय उणे आहे आपुल्या सारे ॥२॥
एका जनार्दनी विनाविती ठाव देई तू आपल्या चरणी रे ॥३॥