रामकृष्ण गोविंद नारायण हरी । केशव मुरारी पांडुरंग ॥धृ॥
लक्ष्मी निवासी पाहे दीनबंधु । तुझा लागो छंद सदा मज ॥१॥
तुझे नामी प्रेम । देई अखंडित । नेणे तप व्रत दान काही ॥२॥
तुका म्हणे माझे हेचि बा मागणे । अखंडित गाणे नाम तुझे ॥३॥