दळिता कांडिता तूज गाईन अनंता ॥धृ॥
न विसंबे क्षणभरी । तुझे नाम गा मुरारी ॥१॥
माय बाप बंधु भगिनी । तुच सखा चक्रपाणी ॥२॥
नित्य हाची कारभार । मुखी नाम निरंतर ॥३॥
लक्ष लागलेसे चरणी । म्हणे नामयांची जनी ॥४॥