उद्धरिले कुळ आपण तरला । तोची एक त्रैलोक्यात ॥१॥
त्रैलोक्यात झाले द्वैतची निमाले । ऐसे साधियेले साधन वरवे ॥२॥
बरवे हे साधव सुख शांती मना । क्रोध नाही जाणा तिळभरी ॥३॥
तिळभरी नाही चित्तासी तो मळ । तुका म्हणे जळ गंगेचे ते ॥४॥