जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन । भगवंत जाण त्याचे जवळी ॥१॥
त्याचे जवळी देव भक्ती भावे उभा । स्वानंदाचा गाभा तया दिसे ॥२॥
तया दिसे रूप अंगुष्ठ प्रमाण । अनुभवी खुण जाणती हे ॥३॥
जाणती हे खूण स्वात्म अनुभवी । तुका म्हणे पदवी ज्याची त्याला ॥४॥