ओळखारे वस्तु सांडारे कल्पना । नका आडराना जाऊं झणी ॥१॥
झणी जाल कोठे बूडवाल हीत । विचारी मनांत आपुलिया ॥२॥
आपुलिया जीवे शिवासी पहावे । आत्मसुख घ्यावे वेळोवेळी ॥३॥
घ्यावे आत्मसुख स्वरुपी मिळावे । भूती लीन व्हावे तुका म्हणे ॥४॥