भूती लीन व्हावे सांगावे नलगेची । आता अंहकाराची शांति करा ॥१॥
शांती करा तुम्ही ममता नसावी । अंतरी वसावी भूतदया ॥२॥
भूतदया ठेवा मग काय उणे । प्रथम साधन हेचि असे ॥३॥
असे हे साधन ज्याचे चित्ती वसे मायाजाळ नासे तुका म्हणे ॥४॥