मायाजाळ नासे या नामे करूनी । प्रीति चक्रपाणी असो द्यावी असो द्यावी प्रीती साधुच्या पायासी । कदा किर्तनासी सोडू नये ॥१॥
सोडू नये पुराण श्रवण किर्तन । मनन निजध्यासन साक्षात्कार ॥२॥
साक्षात्कार झालिया सहज समाधी । तुका म्हणे उपाधी गेली त्याची ॥३॥