आधी रचिली पंढरी, मग वैकुंठ नगरी । जेव्हा नव्हते चराचर, तेव्हा होते पंढरपुर । जेव्हा नव्हता गोदा गंगा, तेव्हा होती चन्द्रभागा चन्द्रभागेच्या तटी, धन्य पंढरी गोमटी । नासलीया भुमंडळे, उरे पंढरी मंडळे ॥