जन्मासी येवोनी पहारे पंढरी, नाचा महाद्वारी देवापुढे ॥धृ॥
चंद्रभागे तीरी करा तुम्ही स्नान, घ्यारे दर्शन विठोबाचे ॥१॥
सेना म्हणे माझा पुरलासे हेत, डोळे भरूनी पहात विठ्ठलासी ॥२॥