पंढरी निवासा सख्या पांडुरंग, करो अंगा संगा भक्ताचीया ॥धृ॥
भक्त कैवारीया तूची नारायणा, बोलता वाचेने काय लाज ॥१॥
मागे बहूतांचे फेडियेले ऋण, आम्हासाठी कोण आणी धाडा ॥२॥
वारंवार तुज लागो नाही देवा, बोलणे केशवा म्हणे नामा ॥३॥