तांडव नृत्य करी गजानन ॥धृ॥
धिम-कीत्र धिमकीत वाजे मृदुंग । ब्रह्मा ताल धरी गजानन ॥१॥
तेहतीस कोटी सुरगण दाटी । मध हीम गौरी गजानन ॥२॥
नामी रंगले दीस सदोदीत् । शोभे चंद्र शिरी गजानन ॥३॥
आनंदात्मज म्हणे गजवंदना । भवभय दु:ख करी गजानना ॥४॥