सदगुरु वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी नाही काळ वेळ तया लागी, आपणा सारिखे करितो तात्काळ ॥१॥
लोहपरिसाची न सोहे उपमा, सदगुरु महिमा अगाधची ॥२॥
तुका म्हणे कैसे, आंधळे हे जन गेले विसरून खर्या देवा ॥३॥