ओळखिला देव संतकृपे ज्यांनी, धन्य त्याची जननी काय वाणू ॥धृ॥
झालासे सफल तयांचा संसार, चालवितो भार पांडुरंग ॥१॥
आता नाही त्यासी क्लेश भय चिंता, जने ते अनंता वश केले ॥२॥
झालासे शेवट गोड आयुष्याचा, अमृताची वाचा अमृत बोले ॥३॥