नको देवराया अंत पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे, हरिणीचे पाडस व्याघ्रे धरियेले । मजलागी झाले तैसे देवा ॥१॥
तुजवीण ठाव न दिसे त्रिभुवनी धावे हो जननी विठोबाई ॥२॥
मोकलूनी आस झाले उदास घेई कान्होपात्रे हृदयात ॥३॥