धाव धाव रे द्रौपदीच्या भावा धाव धाव रे । बहीण तुझी द्रौपदी विनविते केशवा ॥धृ॥
पांडवाने द्युत खेळीला कौरवाने घात केला । दुःशासने ओढीला पदर, दुरून पाहतो शारंगधर । नामा म्हणे न कळे हरीची करणी, पुराणी बोले व्यास वाणी ॥१॥