घट डोईवर घट कमरेवर सोडी पदरा नंदलाला ॥धृ॥
कुणी तरी येईल, अवचित पाहील, जाता आगही लावील, सर्व सुखाच्या संसाराला ॥१॥
हलता कलता घट हिंदळता, लज्जेवरती पाणी उडता नकोच होईन मीच मला ॥२॥
केलीस खोडी पुरे एवढी जोवरी असते मनात गोडी, हसूनी तुम्ही हो बाजुला ॥३॥