तांडवनृत्य करी गजानन ॥धृ॥
धिमकी धिमकी वाजे मृदुंग ब्रह्मा ताल धरी ॥१॥
तेहतीस कोटी सुरगण दाटी मध हिमगौरी ॥२॥
नामी रंगले दास सदोदित शोभे चंद्र शिरी ॥३॥
आनंदात्मज म्हणे गजवदना-भव भय दु:ख हरी गजानन ॥ तांडव ॥४॥