माझे माहेर पंढरी आहे भीमयेच्या तीरी । बाप आणि माझी आई आहे विठ्ठल रखुमाई । बंधु आहे पुंडलिक त्याची ख्याती वर्णु काय । बहिण आहे चंद्रभागा करितसे पाप भंगा । एक जनार्दनी चरण करा करा माहेरची आठवण ।