लाखात लाभले भाग्य तुला ग बाई, विटेवरच्या विठ्ठलाची झालीस रखुमाई ॥धृ॥
मेघासम जो हसरा शाम, चंद्राहून जो अधिकही शीतल, नाम जयाचे मुखात येता रुप दिसे ग ठाई ॥१॥
भक्ताचा जो असे आसरा ह्या विश्वाचा हरी मोहरा, क्षणात इकडे क्षणात तिकडे हाकेला ग धावत येई ॥२॥