सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण । ब्रह्म सनातन विठ्ठल हा । पतित पावन मानस मोहन ब्रह्मसनातन विठ्ठल हा । ध्येय ध्याता ध्यान चित्त निरंजन ब्रह्म सनातन विठ्ठल हा । ज्ञानदेव आनंदची झाला आनंदची झाला ॥