ॐ नमः शिवाय बोला । शिवाय बोला । शिव हा सर्वाभूती नटला । संताना बोध हा पटला । वरि भक्तांच्या हृदय पटाला । जगी सर्व प्रकट झाला । शिवाय बोला । संताचे वागुणे मोठे । फणसा अंगी दिसाती काटे । आंत भरले अमृत साठे । जगी कार्य सिद्ध करण्याला शिवाय बोला ।