देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो । सुंदर चांदण्या, चंद्र हा सुंदर चांदणे सुंदर पडे त्याचे । सुंदर ही झाडे सुंदर पाखरे गाती गोड गाणी देवा तुझी । सुंदर वेलींची सुंदरही फुले तशी आम्ही मुले देवा तुझी ।