हासत हासत आई आली घालूनी पैंजण पायी पायी । पिवळी पैठणी हिरवी चोळी । शोभे कुंकुम चिरी भाळी ॥१॥
रत्नजडीत हार शंख चक्र करी नयनी काजळ ल्याली ल्याली ॥२॥
विष्णुदास म्हणे ऐसी माऊली सिंहावरी मी देखिली देखिली ॥३॥