जाईन मी आता आपुल्या माहेरी । निरोप संता हाती आला । माझे ऐकले कानी । कळवळा मनी करुणेचा । साधुपंथे लागते कैसे चित्ता, वाट पाहाते नित्ये माहेराची । तुका म्हणे आता येतील न्यावया । अंगे आपुलीया मायबापा ।