रजसत्वतम तीन गुणांनी मूर्ति ही सजली, मला ही माहुरगडी दिसली ॥धृ॥
चंद्रसूर्य जणू दिव्य लोचनी, भली कुंकूम आरक्त वर्णी, वात्सल्याचे हास्य मुखावरी, भुवरी अवतरली ॥१॥
भुजंगवेणी रूळे पाठीवर, भांगी शेंदूर कटी पिंताबर, पायी पैंजण रुणझूण करती, भुवरी अवतरली ॥२॥