नाथगुरु घ्यावा हो गावा ॥धृ॥
ब्रह्मानंद रसाचा मेवा खावा हो खावा, वायुरोधन विधी करूनिया केला विषिनिवास ॥१॥
यज्ञ, याग तप केले परि ते भजनाविण उदास ॥२॥
करूनि व्रत उपवास वाढवी शिरी जटांचे पाश ॥३॥
हृदयी संपुटी नाही तरी व्यर्थ तयाचे क्लेश ॥४॥