पणतीत घालूनी पाणी, बाबाने उजळल्या ज्योती ॥धृ॥
नाहीच दिधले तेल कोणी म्हणूनी घालले त्यांत पाणी ॥१॥
दाविला चमत्कार साई । लागले तुझ्याच पायी ॥२॥
शुद्ध ज्याचा भाव, शुद्ध ज्याचे मन, तेथे साईचे स्थान ॥३॥