आनंदाचा कंद हरी हा देवकीनंदन पाहिला ॥धृ॥
भक्तासाठी तो जगजेठी भीमा निकटी राहीला ॥१॥
कंस भयाने वसुदेवाने नंदयशोदा वाहिला ॥२॥
यज्ञयाग जपतपासी भुले ध्यान धारने भुलीला ॥३॥
निश्वय साचापरी तुकयाचा भक्ति गुणासी मोहिला ॥४॥