जय जय विठ्ठल विठ्ठल हारी दिंडी चालली पंढरी, जय जयविठ्ठल हारी ॥धृ॥
कृष्णाकाठी वाळवंटी भजन करीती वारकरी ॥१॥
टाळविण्याचा नाद दुमदुमे थयथय नाचती वारकरी ॥२॥
कृष्णाकाठी सखुसुंदरी घेऊनी आली घागरी ॥३॥
भान विसरले त्यात मिसळले संत सखुचा हात धरी ॥४॥