आमचे शिंके तिसरे ताळी हात कसा पुरतो । मांजर होऊनी गुरुगुर करतो गुरकारी देतो ॥२॥
जवळ बसोनी कान्हा गोष्टी काय मला पुसतो । काल पासूनी चेंडू हरवला तुझपाशी दिसतो ॥३॥
हरी चरणाची दासी मी झाले ठाव मला पुसतो । एका जनार्दनी पूर्ण कृपेने मोक्ष पदी नेतो ॥४॥