HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|भाग ६|
भजन  आमचे शिंके तिसरे ताळी हात भजन पहिली गवळण धावत आली यशोदे
भजन - हरि हा कोणासी ऐकेना कृष्ण...


भजन - A bhajan or kirtan is a Hindu devotional song, often of ancient origin. Great importance is attributed to the singing of bhajans with Bhakti, i.e. loving devotion. "Rasanam Lakshanam Bhajanam" means the act by which we feel more closer to our inner self or God, is a bhajan. Acts which are done for the God is called bhajan.

45GOOG
भजन

हरि हा कोणासी ऐकेना कृष्ण हा कोणास ऐकेना यशोदे बाळ तुझा तान्हा कुठवरी सोसू मी धिंगाना ॥धृ॥

गवळण सांगती गार्‍हाणे रात्री आले चक्रपाणी । खाऊनी दही दूध तुप लोणी व अवघ्या विरजनी फोडोनी ॥१॥

दुसरी गवळण सांगती रात्री आले मंदिराती । हात खांद्या वरी टाकी गळे माझ्या पडती ॥२॥

तिसरी गवळण सांगती हरी आम्ही काय केली करणी । पतीची दाढी माझी वेणी बळकट गाठ बांधोनी ॥३॥

चवथी गवळण सांगती रात्री आले वाड्या मधे । वासरु सोडुनी गाईसी दुधाची चरवी सांडूनी ॥४॥

अवघ्या गवळणी मिळोनी जला चाऊ गोकुळ सोडूनी । गोकुळामध्ये चक्रपाणी त्यांच्या लागू सर्व चरणी ॥५॥

Translation - भाषांतर

N/A
45GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-06-04T01:04:08.0000000Z

Comments | अभिप्राय