कशी मधुवन मुरली वाजवीली ॥धृ॥
जात मी होते यमुनेच्या पाण्या डोईवर घागर पाझरली ॥१॥
करीत मी होते गृही काम धंदा येऊनी हृदयी संचरली ॥२॥
मिरा कहे प्रभू गिरधर नागर राधा गौळण घाबरली ॥३॥