HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|भाग ६|
भजन सांगा या शिवाला माझ्या शं भजन शंभो कैलासीचा राजा । त्या
भजन - शिव रात्री शिव दिन माऊली ...


भजन - A bhajan or kirtan is a Hindu devotional song, often of ancient origin. Great importance is attributed to the singing of bhajans with Bhakti, i.e. loving devotion. "Rasanam Lakshanam Bhajanam" means the act by which we feel more closer to our inner self or God, is a bhajan. Acts which are done for the God is called bhajan.

45GOOG
भजन

शिव रात्री शिव दिन माऊली शिव प्रसन्न झाला । उद्धरला पारधी बंध हरणीचा सोडविला ॥धृ॥

असो कर्माला कोणे एके दिवसी आली महाशिवरात्र । शिकारीला चालला पारधी धनुष्य बाण घेऊनी हाती । शंख भैरव नाना तर्‍हेचे वाद्ये वाजली । पार्वती वल्लभ हरिहर महादेव गर्जना करिती । महादेवाला शंकराला महापूजा येती । गंध अक्षदा पुष्प पत्रिका देवाला वाहती ॥ असे पारध्याने पाहिले शंकरा काय धोंडा बोलेल शंकरा । शिव हर बोलरे शंकरा । पारध्यासी नवल वाटले शंकरा । लोकाला वेड लागले शंकरा । हरहर म्हणतो मुखामध्ये चाळा लागला । असे करमीला पुढे पारधी शिकारीसी गेला ॥१॥

पंचवटीचे वन होते महादारूण । त्या वनाच्या ठाई तळे एक भरले पाण्याने पाणी पाहूनी शिकार साधावया रमला येऊनी । बेलाचे वृक्ष असे बहू दाट त्यावर बसला येऊनी अडचण मुकच्या फांद्या खाली टाकी तोडोनी । महादेवाला शंकराला महापूजा घडली अनेशानी । बेलाचे वृक्ष घनदाट शंकरा । त्याखाली लिंगाकार शंकरा । बेल तोडूनी टाके त्यावर शंकरा । मुखी बोले हरी ओम शंकरा । त्यासी घडे रात्री जागरण शंकरा । सर्वसाधन साधूनी घडूनी आले पहा पारध्याला पापाच्या खाईमध्ये केवळ महाअग्नी शिरला ॥ शिवरात्री ॥२॥

तान्ही बाळी लेकुरवाळी हरणी पाण्यापाशी आली पाणी पिता अवचीत नजर पारध्याची गेली । लाविला धनुष्य बाण कानडी कडकडूनी ओढली । तेव्हा संकट वाचा देवाने हरणीला दिली । नका मारू स्वामी राया अर्जीं केली । घरी बाळ माझे उपवसी शंकरा मी पाजूनी येते त्यासी शंकरा । पारघी बोले हरणीसी शंकरा । खरे न लटके बोलू असे म्हणती पारध्यासी कळवंतनीचा बट्टा लागेल बेचाळीस कुळीसी । पहिली हरिणी तिची बहिण बाळाजवळ गेली । या बाळानो लवकर या मन अर्जी केली । बाळ म्हणते हे काय न लगे काळोखी चढली । अवघे शरीर गार तुझे छाती दणाणली । खरच सांगशील तरच पिऊ हरिची आण केली । तिची बहिण दुसरी हरिणी पाण्याजवळ आली । पाणी पिता अवचीत नजर पारध्याची गेली । लाविला धनुष्यबाण कडकडूनी ओढी तेव्हा संकट वाचा देवाने हरिणीसी दिली । नका मारू स्वामी राया मन अर्जी केली । आज चौथा दिवस मजशी ऋतू प्राप्त झाली । पती रायाशी भेटूनी येते मन अर्जी केली । पारधी बोल हरिणीशी शंकरा । तुम्ही भयालीगे मरणाला शंकरा । ती रंभा मी उर्वशी शंकरा । लागला विषयाचा छंद इंद कोपला । झाला ऋषीचा शाप म्हणूनी आम्ही आलो जन्माला ॥३॥

दुसरी हरिणी तिची बहिण मृगाजवळ गेली । या पतिराया लवकर या मन अर्जी केली । पती म्हणे हे काय न लगे काळोखी चढली । अवघे शरीर गार तुझे छाती दणाणली । खरच सांगशील तर भेटू हरिची आण केली । तेव्हा संकट हरिणीचे नेत्र पाण्याने भरली । काय सांगू पती राया शंकरा । मी गेले पाणी पिया शंकरा । जोडीला बाण माराया शंकरा । मी जाणूनी तुमच्या समया शंकरा । मी आले भेटूनी जाया शंकरा । लागा बांधा तागा स्वामी आज माझा सरला । मृग म्हणतो शिर देवूनी सोडवूनी तुजला ॥४॥

दोन हरिण्य दोन बाळे मृग पाच जण । आले सर्व पारध्याजवळ कळप दंग झाला पारधी पाहून । हरिण्या म्हणती आम्हा परती न्या जा मारुन । दोन बाळे तिसरा मृग द्या तुम्ही सोडून । बाळ म्हणते केवळ मांस खा जा मौजेन । माता पिता आजाब वस्तू द्या तुम्ही सोडून । मृग म्हणतो हे बरोबर नव्हे द्या तयाना सोडून । ताजा पिता बखळ खाजा न्यायला मारुन । गळाले हातचे बाण शंकरा । गज बजले सारे रान शंकरा । गजबजले त्रीनयन शंकरा देव निघाले पिंडीतुन शंकरा । महापूजा मांडीली त्याने शंकरा । त्यानी नेले उद्धरुनी शंकरा विमान बोलावूनी शंकरा । आत सर्वाना बसवूनी शंकरा । गेले कैलासी घेऊनी शंकरा आज कोण भक्त येऊनी शंकरा त्यासी नेले उद्धरुनी शंकरा हे अनंत रायाचे गाणे शंकरा । माघ माशी चतुदर्शीच्या दिवशी उद्धार हरिणीचा केला ॥५॥

Translation - भाषांतर

N/A
45GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-06-04T20:30:36.0000000Z

Comments | अभिप्राय