पाहिले प्रभूच्या चरणाला, चुकले जन्म मरणाला । प्रपंचाला बहु विटले, हरिच्या चरणासी नटले । चित्रगुप्ताला वही पुसले, पावन केले दासाला । हरीचे पाऊल लहान, भागवती केले वर्णन । भक्ती गोंडा नेटका, लागूना गेला चटका ।