HOME|मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|भाग ६|
भजन यमराया मजला रे यमराया मजल भजन धाव घेई पंढरीराया धाव घेई
भजन - तनू कृतार्थ झाली काय मागू...


भजन - A bhajan or kirtan is a Hindu devotional song, often of ancient origin. Great importance is attributed to the singing of bhajans with Bhakti, i.e. loving devotion. "Rasanam Lakshanam Bhajanam" means the act by which we feel more closer to our inner self or God, is a bhajan. Acts which are done for the God is called bhajan.

45GOOG
Template Page

तनू कृतार्थ झाली काय मागू या हरीला । देई भक्ती सुधारस नित्य प्यावया मजला ॥धृ॥

कधी मला न व्हावी विषय विषाची बाधा । मी त्रिगुण तंतूने वेष्टिलो रे गोविंदा । मम हृदयी नसावा ठाव क्षणभरी क्रोधा । हा काम गांजितो वारूनी दे आनंता । मूळ अहंकार हा लावितसे ममवृंदा । हा मोह फसूनी मोह लावितो नादा । मजसाठी श्रमली माता श्रीघरा । दे आस पुरवूनी माते उद्धरा । नको नाशवंत हे सारे लेकरा ।

मज अढळ असावे स्थान तुझ्या पदकमला । कधी भंग न व्हावा हेची मागतो देवा ॥१॥

खुण सांगूनी गेले ब्रह्ममुनी मज आता । मी प्रचीत पावलो मोहोनी दीनानाथ, मी सागूं कुणाला तुजवीण दु:खद वार्ता । तुज सर्व ठावूके गावू किती मम गाथा । मज पाजवी पान्हा तुची तात मम माता । सव चंद्र अमृत तू नाही चकोरे चिंता । हरणीने पाडसा नाही टाकीले । धेनूने वत्सा नाही लोटिले, ते असे देवा माते पाळीले । हे सर्व शाश्‍वत आजवरी न कळे मजला, त्या सद्‍गुरुनाथा ज्ञान उदय पाडिला ॥२॥

बैसोनी विमानी सुरवर बघती नयना, त्या शिशूबाळाच्या ऐकोनी मंजूळ वचना । दशसहस्त्र वर्ष राज्य करी या भुवना करी दिधले ऎसे प्रेमभरे वरदाना । शशी-सूर्य प्रदक्षणा नित्य घालिती जाणा । धृव अढळ स्थापिला सुर्यवंशीचा राणा । आख्याण धृवाचे येथे संपले । देतील मान मज वाटे जन भले । हरतील पातके ऐसे ऐकले । घृव कथा मृतासी प्राशुनीया कृष्णेला । हा प्रमोद म्हणते गाईल कोण हरीलीला ॥३॥

Translation - भाषांतर

N/A
45GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-06-04T20:47:40.0000000Z

Comments | अभिप्राय